Saturday, 24 September 2016

अधिक उत्पादनासाठी परागीभवन

गेल्या वर्षी आम्ही एक भोपळ्याचा वेल पावसाळ्यात लावला होता. त्यापासून आम्हाला चार मध्यम आकाराचे भोपळे मिळाले. त्यातला एक भोपळा काढल्यानंतर थोड्याच दिवसांनी कुसून गेला. गेल्या वर्षी पाऊस कमी होता आणि वेलावरील मादी फुले कुसण्याचे प्रमाण नगण्य होते परंतु फळधारणा झाल्यानंतर फळे कुसण्याचे प्रमाण मात्र अधिक होते.
ह्या वर्षी त्याच जागी परत एकदा भोपळ्याचा वेल आम्ही लावला. ह्या वर्षी त्या एकाच वेलापासून १४ भोपळे काढले आणि त्यातले काही अधिक मोठ्या आकाराचे होते. जात तीच होती, खताचे प्रमाणही कमी होते, गेल्या वर्षीपेक्षा पाऊसही बराच जास्त होता आणि तरीही हे शक्य झाले.
त्यासाठी मला साधारण २० दिवस दररोज ५ मिनिटे द्यावी लागली. ह्या १०० मिनिटांमध्ये मी दररोज वेलावर आलेल्या नर फुलांवरील परागकण काढून त्याच वेलाच्या मादी फुलांवर टाकत असे. परागीकरण करणाऱ्या किड्यांची निसर्गामध्ये कमी झाली आहे. तसेच मुसळधार पावसाच्या दिवशी हे कीटक बाहेर पडण्याचे प्रमाणही कमी असते. अश्या परिस्थितीत आपणच एखाद्या ब्रशच्या सहाय्याने हे काम करता येते आणि तेच मी केले.
परागीकरणामुळे फलन प्रक्रिया व्यवस्थित होऊन फळे वांझ राहत नाहीत व परिणामतः फळांची वाढ वेगाने व अधिक होते. त्याचप्रमाणे फळे तयार होण्यापूर्वी कुसण्याचे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी होते.
हे सर्व फायदे मला थोड्या कष्टाने मिळाले. मी दिलेल्या वेळाची व कष्टाची किंमत साधारण रू.१००  जरी मानली तरी त्याद्वारे मला रु.३०० तरी अधिक मिळाले. (हे मी सध्या असलेल्या मुंबईसारख्या मोठ्या शहरातील घाऊक बाजाराच्या दराच्या आधाराने लिहीत आहे. स्थानिक बाजारपेठेत किंवा थेट ग्राहकाला माल विकल्यास ह्याच्या कितीतरी पटीने अधिक पैसे मिळवता येतील.
काकडीवर्गीय पिकांमध्ये हा प्रयोग जरूर करून पाहण्यासारखा आहे. आपले अनुभव जरूर कळवा.

6 comments:

 1. सचिन तुझं बरोबर आहे.कृत्रिम परागी भवनाने हे खरच शक्य आहे. उन्हाळी भोपळा पिकामध्ये मी गेली दोन वर्ष सतत हा प्रयोग करत आहे.मला पण त्याचा चांगला अनुभव आला आहे.

  ReplyDelete
 2. सचिन तुझं बरोबर आहे.कृत्रिम परागी भवनाने हे खरच शक्य आहे. उन्हाळी भोपळा पिकामध्ये मी गेली दोन वर्ष सतत हा प्रयोग करत आहे.मला पण त्याचा चांगला अनुभव आला आहे.

  ReplyDelete
 3. Me nakki he karun baghato, dhanyawad!

  ReplyDelete
 4. Me nakki he karun baghato, dhanyawad!

  ReplyDelete